Post-mortem of Nanded’s health system । नांदेडच्या आरोग्य व्यवस्थेचे होणार पोस्टमार्टम ; आरोग्य हक्क परिषदेचे आयोजन

Post-mortem of Nanded’s health system नांदेड : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यायात (Dr. Shankarao Chavan Medical College Nanded) नवजात अर्भकांचा आणि रुग्णांचा मृत्यू (Death of newborns and patients at Government Medical College, Nanded) झाला होता. त्यानंतर आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याचे उघड झाले होते. नांदेड नागरी कृती समिती (Nanded Civic Action Committee) आणि जन आरोग्य अभियानाच्या वतीने आरोग्य हक्क परिषदेचे (Arogya Hakka Parishad) आयोजन आयोजित करण्यात आले असून, त्यात रुग्णसेवेचे पोस्टमार्टम केले जाणार आहे. (Post-mortem of Nanded’s health system; Organization of Health Rights Council)

 

नांदेडच्या पीपल्स कॉलेज परिसरातील स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र सभागृहात शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 रोजी आरोग्य हक्क परिषद होणार आहे. आरोग्य अभियानाच्या सत्यशोधन समितीने नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या 24 मृत्युंबाबत तयार केलेल्या अहवालाचे यावेळी प्रकाशन केले जाणार आहे.

 

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यायाच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये दिनांक ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यानच्या २४ तासात २४ मृत्यू झाले. या पैकी १२ मृत्यू हे नवजात शिशुंचे होते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी ही घटना आहे.

Excise duty on beer बीअरवरील उत्पादन शुल्क कपातीसाठी होणार अभ्यास, काँग्रेस आमदारांने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

 

या घटनेचे जन आरोग्य अभियान महाराष्ट्रच्या समितीने, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्याय, रुग्णालय या बरोबरच नांदेड मधील सार्वजनिक आरोग्य सेवा देणाऱ्या इतरही व्यवस्थांना भेट देऊन तथ्य शोधन केले आहे.

 

जन आरोग्य अभियान महाराष्ट्र, हे मागील २३ वर्षांपासून आरोग्य हक्कांवर काम करणारे कार्यकर्ते, संघटना आणि डॉक्टर्स यांचे नेटवर्क आहे. तथ्य शोधन समितीचा अहवाल प्रकाशन (Publication of the Report of the Search Committee) आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी व कृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी ही आरोग्य हक्क परिषद घेतली जात आहे. या परिषदेला नांदेडमधील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Local ad 1