...

युद्धभूमीवर शांततेसाठी पुण्यात प्रार्थना

पुणे : इस्रायल आणि पॅलेस्टाईन  (War in Israel and Palestine) देशात सुरु असलेल्या युद्धात लहान मुले, महिला आणि सर्व सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. या दोन्ही देशात शांतता नांदावी, यासाठी पुणे शहर कुल जमाती तंजीमच्या (Kul Jamati Tanjim) वतीने ईदगाह मैदानावर रविवारी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली.  (Prayers in Pune for peace on the battlefield)

 

सर्वधर्मीय प्रार्थना सभेत गुरुद्वाराचे अध्यक्ष भोला सिंह अरोरा, भंते हर्षवर्धन, मौलाना गुलाम अहमद काद्री, मौलाना खालिद निजामी यांनी विश्व शांतीसाठी प्रार्थना केली. भंते हर्षवर्धन यांनी जगात अहिंसा नांदावी याकरिता व युद्धात मृत महिला आणि लहान मुले यांच्यासाठी बौध्द वंदना केली. प्रार्थनेसाठी महिलाही सहभागी झाल्या होत्या.

 

 

युद्ध मानवतेसाठी सर्वात मोठा शत्रू असून, युद्धात महिला आणी लहान मुले मृत अथवा जखमी होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. मात्र, इस्रायल आणि पॅलेस्टाईन  मध्ये महिला, लहान मुले आणि सामान्य नागरीक बळी ठरत आहेत. हे सर्व थांबावे, ईश्वर या दोन्ही देशांना सदबुद्धी देवो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे संयोजन अहमद सय्यद, जावेद खान, मोहुनुद्दिन शेख, सिराज बागवान, झाहिद शेख, सलीम मौला पटेल, सलीम शेख  आदींनी  केले.

 

 

 

Local ad 1