प्रशांत शिंदेंच्या बाजूने पुण्यातील ‘जवळेकर’ मतदार एकवटले !

जवळा ग्रामविकास पॅनलच्या बैठकीला तुफान प्रतिसाद !

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे वातावरण तापले आहे. जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीची निवडणुकीत जवळा ग्रामविकास पॅनलने जोरदार तयारी हाती घेतलीय. जवळा ग्रामविकास पॅनलच्या वतीने पुणे पिंपरी चिंचवड, भोसरी, चाकण हडपसर, कात्रज या भागात वास्तव्यास असलेल्या जवळा गावातील मतदारांची नुकतीच बैठक पार पडली.या बैठकीला जवळेकर मतदारांनी तुफान प्रतिसाद दिला.

सरपंच प्रशांतभाऊ शिंदे यांनी सरपंचपदाच्या पाच वर्षांच्या कालावधीत गावातील विकास कामांचा अनुशेष भरून काढल्याबद्दल जवळेकर मतदारांनी प्रशांतभाऊ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. यंदा होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जवळा ग्रामविकास पॅनलला एकजुटीने पाठिंबा देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

In favor of Prashant Shinde voters in Pune have united, jawala Gram Panchayat Election 2023

जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच प्रशांतभाऊ शिंदे हे जवळा ग्रामविकास पॅनलच्या माध्यमांतून निवडणुकीला सामोरे जात आहेत. या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जवळा ग्रामविकास पॅनलच्या वतीने कात्रज, पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी व चाकण, या भागात वास्तव्यास असलेल्या जवळेकर मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

In favor of Prashant Shinde voters in Pune have united, jawala Gram Panchayat Election 2023

यावेळी पार पडलेल्या बैठकीत सरपंच प्रशांतभाऊ शिंदे उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर व इतर नेत्यांनी मागील पाच वर्षांत गावात राबवलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला. पाच वर्षापुर्वी गाव कसं होतं आणि आता सरपंच प्रशांतभाऊ शिंदे यांच्या माध्यमांतून गावचा चेहरामोहरा कसा बदलला आहे यावर अनेक मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

In favor of Prashant Shinde voters in Pune have united, jawala Gram Panchayat Election 2023

कृतिशील विकासाचा गतिशील मार्ग दाखवून जवळा गावचा विकासाचा अनुशेष भरून काढल्याबद्दल यावेळी मतदारांनी जवळा ग्रामविकास पॅनलच्या नेत्यांचे आभार मानले. उपस्थित सर्वांनी विकासाभिमूख दुरदृष्टी असलेल्या जवळा ग्रामविकास पॅनलच्या पाठीशी एकजुटीने आपली ताकद उभी करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

In favor of Prashant Shinde voters in Pune have united, jawala Gram Panchayat Election 2023

बैठकीत कोण काय म्हणाले ?

 

प्रशांतभाऊंनी जवळा गावातील अनेक तरूणांना उच्च शिक्षण तसेच नोकरीसाठी मार्गदर्शन केले. पुण्यात कुठे चांगले शिक्षण मिळेल, कुठे चांगली नोकरी मिळेल याबाबत मार्गदर्शन केले. त्याचा गावातील अनेक तरूणांना फायदा झाला.

– विनोद वाळुंजकर 

 

” प्रशांतभाऊ शिंदे यांचे बंधू सुभाष शिंदे यांनी पुण्यातील आर एम सी प्लांट या कंपनीमध्ये जवळा गावातील 50 पेक्षा अधिक मुलांना जॉबला लावले. पुण्यात येणाऱ्या अडी अडचणीच्या काळात प्रशांतभाऊ यांनी नेहमी सहकार्य केले.”

– किसन रोडे

“प्रशांतभाऊंनी महावितरण, तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून गावातील लोकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र काम केलं. जनतेसाठी कायम वेळ देणारा युवा नेता म्हणून प्रशांतभाऊ शिंदे यांची जामखेड तालुक्यात ओळख आहे. ”

– अजित लेकुरवाळे

 

“गेल्या अनेक वर्षांनंतर जवळा गावच्या विकासाचा बॅकलॉग प्रशांत भाऊंनी भरून काढला आहे. प्रशांत भाऊच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात गावात अनेक विकास कामे झाले आहेत. गेल्या पाच वर्षात गाव कसं होतं आणि आत्ताच्या पाच वर्षात गावाचा चेहरा मोहरा कसा बदलला हे गावात गेल्यानंतर दिसून येत. प्रशांत भाऊंनी गावात केलेली कामं कौतुकास्पद आहेत.”

-विष्णू कोल्हे

Local ad 1