(Nawab Malik’s reply to Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीसांना नवाब मलिकांचे प्रतिउत्तर
मुंबई : ‘देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी समिती असते. थेट मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वत:च्या अधिकारात बदली करत नाहीत, हे फडणवीसांना माहित आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये हेराफेरीचा आरोप फेटाळून लावत, फडणवीसांच्या आरोपाला राष्ट्रवादीचे प्रवृक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. (Nawab Malik’s reply to Devendra Fadnavis)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत. त्यावर नवाब मलिक प्रतिक्रिया दिली आहे. (Nawab Malik’s reply to Devendra Fadnavis)
पोलीस महासंचालकांनीही पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटच्या संदर्भात एक अहवाल राज्य सरकारला दिला होता. त्या अहवालाची प्रत माझ्याकडे असून, त्याशिवाय, ६.३ जीबीचा डेटाही आहे. त्यात सर्व प्रकारच्या संभाषणाचा पुरावा आहे,’ असे फडणवीस म्हणाले आहेत. (Nawab Malik’s reply to Devendra Fadnavis)
फडणवीसांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग बेकायदेशीरआहे. ‘देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री होते. बदल्या करण्यासाठी समिती असते.थेट मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वत:च्या अधिकारात बदली करत नाहीत. तसेच रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग बेकायदेशीर होते. म्हणून त्यांना शिक्षा म्हणून त्यांची बदली करण्यात आली,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. (Nawab Malik’s reply to Devendra Fadnavis)
सरकार स्थापन होताना रश्मी शुक्ला महाविकास आघाडीच्या लोकांचे फोन टॅप करण्याचे काम करत होत्या, अस दावाही मलिक यांनी केला आहे. रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट असल्यासारखे काम करत होत्या, असा आरोप मलिक यांनी केला आहे. (Nawab Malik’s reply to Devendra Fadnavis)