Parbhani ACB News । परभणी : पेट्रोल पंपाची (Petrol pump) वायरिंग जळाल्यामुळे पेट्रोल बंद पडला होता. तो दुरुस्त करण्यासाठी वैध मापन विभागाकडून स्टॅम्पिंग करून घेणे आवश्यक होते. ते करुन देण्यासाठी निरीक्षक वैधमापन शास्त्र विभाग – 1 परभणी (Inspector Metrology Department – 1 Parbhani) यांनी 40 हजार रुपयांची लाच मागणी केली. तडजोडीनंतर 30 हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या (ACB) पथकाने अटक केली. (Parbhani ACB News. Validation inspector arrested while accepting bribe of Rs.30 thousand)
अरविंद नामदेवराव रोडेवाडकर (Arvind Namdevrao Rodevadkar) (वय 57 वर्ष, पद – निरीक्षक, वैधमापन शास्त्र विभाग 1, परभणी. ( वर्ग -2 राजपत्रित ) रा.कैलास नगर, नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
IAS officer Tukaram Mundhe। धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या पेट्रोल पंपाची वायरिंग जळाल्यामुळे तो बंद पडला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपाची दुरुस्ती केल्यानंतर निरीक्षक वैधमापन शास्त्र विभाग – 1 परभणी यांचे कडून स्टॅम्पिंग करून घेणे आवश्यक आहे. स्टॅम्पिंगची शासकीय शुल्क 11 हजार रुपये असून, तक्रारदार यांनी दिनांक 17 जुलै रोजी ऑनलाइन चलानद्वारे भरली आणि वरील शासकिय कार्यालयात स्टॅम्पिंग साठी अर्ज दाखल केला.
तक्रारदार हे आलोसे यांना भेटले असता पेट्रोल पंपाची स्टॅम्पिंग करण्यासाठी आलोसे यांनी 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी शुक्रवारी एसीबी कार्यालय,परभणी येथे तक्रार दिली. त्यानंतर आजच पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांना तडजोडीअंती 30 हजार रुपये लागलीच व स्टॅम्पिंग केल्यानंतर 5 हजार रुपये अशी लाचेची मागणी केली. तर 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे (Superintendent of Police of Nanded Zone Dr.Rajkumar Shinde), पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर (Deputy Superintendent of Police Ashok Ipper) यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. या पथकात पोनि / जकीकोरे, पोह /चंद्रशेखर निलपत्रेवार, पोकॉ/ अतुल कदम, मो. जिब्राईल, शेख मुक्तार, कल्याण नागरगोजे व चालक कदम अँटी करप्शन ब्युरो, परभणी यांचा समावेश होता.