IAS Ayush Prasad । आयुष प्रसाद जळगावचे नवे जिल्हाधिकारी

IAS Ayush Prasad । जळगाव : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले असून, शुक्रवारी ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश (41 Orders of transfers of IAS officers) जारी करण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Pune Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad) यांचाही समावेश आहे. प्रसाद यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Ayush Prasad is the new Collector of Jalgaon)

 

आयुष प्रसाद यांनी आपल्या कार्यकाळात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकारी अधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवून आणली असून, शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन (Teacher transfer process online) करण्यामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्याचबरोबर १०० दिवसांमध्ये विकासकामांचा निधी संपवण्याचा उपक्रम राबविला.  तो यशस्वी झाला आहे.

 

राज्यातील 41 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या ;  तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली

 

कोरोनाकाळामध्ये ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर उभारून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींसाठी निवासी शाळा (Residential School for Girls at Khanwadi in Purandar Taluk) देखील त्यांच्याच कार्यकाळात उभारण्यात आली असून,  अशा प्रकारची राज्यातील पहिली शाळा आहे.

पुणे जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढले होते. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपययोजना करत जिल्ह्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल केली. याशिवाय मुलांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम देखील त्यांनी राबविल्यामुळे मुलांच्या गुणवत्तेत वाढ देखील झाली. आयुष प्रसाद यांनी जळगावला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी महसूल व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Local ad 1