...

अतिवृष्टीमुळे दुर्गम भागात असलेल्या शाळा,अंगणवाड्या बंद ; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : हवामान विभागाने अतिवष्टीचा इशारा दिलेला आहे. तर दुसरीकडे सुरु असलेल्या पावसामुळे पुणे जिल्हादंडाधिकारी आणि  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख (District Disaster Management Authority Chairman Dr.Rajesh Deshmukh) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (District Collector’s order to keep schools and Anganwadis closed)

 

पुणे जिल्ह्यात बुधवारी रात्री घाट माथ्यावर झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार आणि उद्या शुक्रवारी दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (District Collector’s order) या भागातील अंगणवाड्याही आज आणि उद्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (District Collector’s order to keep schools and Anganwadis closed)

 

 

 

ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील. हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित व खाजगी शाळांना लागू आहे.

इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील, असेही सष्ट करण्यात आले आहे. (District Collector’s order to keep schools and Anganwadis closed)

Local ad 1