skill development। एक हजार मुलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण ; बार्टी आणि लर्नेट स्किल्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

skill development पुणे : आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य विकसीत करुन मागासवर्गीय युवकांना स्वतःचा विकास करता यावा नवनवीन उद्योग व नोकर्‍या मिळवता याव्यात यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) (बार्टी) आणि लॅर्नेट स्किल लिमटेड दिल्ली या देशभरातील आघाडीच्या संस्थेशी समाजस्य करार केला आहे. (Memorandum of Understanding between Barty and Lernet Skills Limited) यामुळे मागासवर्गीय युवक आणि युवतीसाठी एक फार मोठी संधी निर्माण झाली आहे. (One thousand children will get skill development training)

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शन सचिव सुमंत भांगे (Secretary Sumant Bhange) व बार्टीचे महासंचालक सुनील वारे (Barti Director General Sunil Vare) यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या एक हजार उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी बार्टी आणि लर्नेट स्किल्स लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य विकास प्रशिक्षणाचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम सन 2023-24 या वर्षात राबविण्यात येणार आहेत.

 

प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे कुशल व्हा व नोकरी मिळवा या संकल्पनेतून नवीन पिढीतील युवक-युवतींसाठी रोजगार आणि उद्योजक करण्यासाठीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सदरील प्रशिक्षण हे महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, औरंगाबाद व रायगड या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहेत.

 

 

प्रशिक्षणाचा लाभ अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना घेता येईल. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा व वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असणे अनिवार्य आहे. प्रशिक्षणार्थ्यांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे व तसेच प्रशिक्षणार्थ्यांची बौद्धिक आणि कौशल्य क्षमता तपासून केली जाईल.

 

 

हायड्रोलिक आणि वायवीय फिटर, सीएनसी ऑपरेटर-टर्निंग, औद्योगिक वेल्डर, व्यावसायिक वाहन चालक आणि मूलभूत देखभाल आणि दुरुस्ती, सहाय्यक बांधकाम पेंटर आणि डेकोरेटर, सहाय्यक इलेक्ट्रीशियन, डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर, अन्न आणि पेय सेवा-कारभारी, जनरल ड्युटी असिस्टंट, हेल्पर मा. प्लंबर जनरल, मेकॅट्रॉनिक्स, व्यवसाय विकास कार्यकारी, उद्योजकता विकास कार्यक्रम इत्यादी 2 ते 6 महिने कालावधी चे प्रशिक्षण दिले जणार आहे.

 

सामंजस्य करारासाठी बार्टीचे निबंधक इंदिरा अस्वार, विभाग प्रमुख (प्रशिक्षण व कौशल्य) अनिल कारंडे, वृशाली शिंदे, महेश गवई, राहुल गित्ते (Barti Registrar Indira Aswar, Head of Department (Training and Skilling) Anil Karande, Vrishali Shinde, Mahesh Gavai, Rahul Gitte) तसेच लर्नेट स्किल्स लिमिटेडचे सुनील जोसेफ, (झोनल हेड, महाराष्ट्र) व ऋषिकेश शेडगे, योगेश देसाई (मोबिलायझेशन मॅनेजर) उपस्थित होते.

Local ad 1