...

wine shop license । वा रे पट्या..! वाईन शाॅपचा परवाना देण्याचे आमिष दाखवत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पत्र देऊन 53 लाख उकळले !

wine shop license । पुणे : वाईन शाॅपचा (किरकोळ मद्यविक्री) परवाना दिला जात नाही. मात्र, तो मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले जातात. असे प्रकार सातत्याने घडत असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांच्या नावे बनावट पत्र देऊन तब्बल 53 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (To give a wine shop license, a fake letter was given in the name of the collector and 53 lakhs was stolen!)

 

 

शिक्रपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष मारुती सातकर – Utkarsh Maruti Satkar (रा. सातकरवाडी ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

wine shop license

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंच राहुल पवार (Former Deputy Sarpanch Rahul Pawar) यांना वाईन शॉपचा परवाना काढून देतो, असे म्हणून त्याच्याकडून तब्बल ५३ लाख रुपये उकळले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पत्र देऊन फसवणूक करणाऱ्या उत्कर्ष सातकर याला पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. आरोपीने अनेक लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तसेच आतापर्यंत 18 जणांना वाईन शाॅपचा परवाना काढून देतो म्हणून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

 

जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य काही ठिकाणी पैसे द्यावे लागतील असे म्हणून वेळोवेळी राहल यांच्याकड्न ५३ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर राहुल यांना जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र देऊन फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्कर्ष सह त्याची पत्नी अंकिता व आई संध्या सातकरयांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

उत्कर्ष हा दिल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलिस नाईक हेमंत कुंजीर, महिला पोलिस शिपाई रूपाली निर्भोरे यांच्या पथकाने दिल्ली गाठत उत्कर्षला अटक केली.

समाजमाध्यमांवर जिल्हाधिकारी यांच्या नावे बनावट खाते उघडण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलीसांकडे रितसर तक्रार केली आहे. अशा बनावट खात्यावरुन काही संदेश, मागणी झाल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासनातील काही कामे करून देण्याच्या बहाण्याने कोणी आमिष दाखविल्यास विश्वास ठेवू नये. नागरिकांनी असे प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे.

Local ad 1