औरंगाबाद : भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तक्रारदारांनी समोर येण्याची आवश्यकता आहे. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जाते. त्यामुळे तक्रारदारांनी समोर यावे, असे आवाहन औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे (Aurangabad Anti-Corruption Department Superintendent Sandeep Atole) यांनी केले आहे. (Report to ACB if bribe is demanded : Superintendent Sandeep Atole)
औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Aurangabad Anti-Corruption Department) वतीने परिक्षेत्रातील जिल्ह्यातील तक्रारदार मेळावा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक राजीव तळेकर, शंकर शिंदे, दिलीप साबळे, गोरखनात गांगुर्डे, पोलिस निरीक्षक हनुमंत वारे, नंदकुमार क्षीरसागर, दिपाली निकम, अनिता ईटुबोने (Additional Superintendent of Police Vishal Khambe, Deputy Superintendent Rajiv Talekar, Shankar Shinde, Dilip Sable, Gorkhanat Gangurde, Inspector of Police Hanumant Vare, Nandkumar Kshirsagar, Dipali Nikam, Anita Etubone) उपस्थित होते.
मेळाव्यात बीड जिल्ह्यातील तीन, उस्मानाबाद १, जालना तीन, औरंगाबा दोन या नऊ तक्रारदारांनी एसीबीच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. यावेळी 29 तक्रारदारांना सुमारे 13 लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
कोणताही शासकीय काम करुन देण्याचा मोबदला म्हणून पैसे मागत असल्यास एसबीकडे तक्रार करावे, असे आवाहन करण्यात आले.