(Public Curfew.. Lockdown .. Unlock and Lockdown again ..!) जनता कर्फ्यू.. लॉकडाऊन.. अनलॉक अन् पुन्हा लॉकडाऊन..!

नांदेड : गेल्या वर्षी कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे अहवाहन केले. त्यानंतर 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केले. त्यानंतर ते वाढविण्यात आला. रुग्ण संख्या कमी असल्याने अनलॉकही करण्यात आले. मात्र, पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. जनता कर्फ्युच्या वर्षपूर्तीनिमित्त सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस पडत आहे. जनता कर्फ्यू.. लॉकडाऊन.. अनलॉक अन् पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. (Public Curfew.. Lockdown .. Unlock and Lockdown again ..!)

गेल्या वर्षी आलेल्या कोरोना विषाणूने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातले. वर्षाअखेरीस कोरोना जातोय, असे वाटत असतानाच पुन्हा त्याने धुमाकुळ घातला आहे. दुसरी लाट आल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे चिंता वाढली असून, एक व्हिडिओ गेल्यावर्षीच्या जनता कर्फ्युची आठवण करून देत आहे. तसेच एका युजर्सने लॉकडाऊन वर्षपुर्ती आहे. त्यामुळे सर्वांनी “ताटल्या, तांबे, टोप, ग्लास, बाडल्या, ड्रम, मडकी तयार ठेवा सण येतोय…” अशा अशायचे मीम्स व्हॅयरल होत आहेत. विशेष म्हणजो गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना योद्धांच्या सन्मानार्थ थाळी वाजवण्यास सांगितले होते. (Public Curfew.. Lockdown .. Unlock and Lockdown again ..!)

लोकांनी आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवा, ताट वाजवून अथवा घंटा-शंख वाजवून आभार प्रकट करू शकतात, असे म्हटले होते. मोदींच्या या आवाहनाचे जनतेने मोठ्या उत्साहात पाळले गेले. काही अतिउत्साही नागरिकांनी रस्त्यावर उतरुन मिरवणुका काढल्या. त्याचे दुसऱ्या दिवशी काही मीम्स व्हायरल करण्यात आले. आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सोशल युजर्सनी गतवर्षीचे मीम्स शेअर करत सर्वांना वर्षपूर्तीच्या शुभेच्छा देत आहेत. (Public Curfew.. Lockdown .. Unlock and Lockdown again ..!)

गतवर्षी देशात कोरोना व्हायरसचा पादुर्भाव वाढत चालला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला देशभरात सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन ही मोदींनी केले होते. मोदींनी नागरिकांना सायंकाळी ५ वाजता घराच्या बाहेर येऊन ५ मिनिटे डॉक्टर, पोलीस, होम डिलिव्हरी करणाऱ्या लोकांचे आभार मानावे असे सांगितले होते. (Public Curfew.. Lockdown .. Unlock and Lockdown again ..!)

Public Curfew .. Lockdown .. Unlock and Lockdown again ..!
पुण्यातील रस्ते अशाप्रकारे ओस पडल्याचे होते…

——-

Local ad 1