विधवा महिलांना सन्मान मिळाला पाहिजे : रेश्मा पाटील

विधवा महिलांना आजही समाजामध्ये मानाचे स्थान मिळत नाही, त्यांच्याकडे एक दुर्लक्षित घटक म्हणून पाहिले जाते. (Widows should get respect : Reshma Patil) त्यांना मान-सन्मान मिळाला पाहिजे,

पुणे : विधवा महिलांना आजही समाजामध्ये मानाचे स्थान मिळत नाही, त्यांच्याकडे एक दुर्लक्षित घटक म्हणून पाहिले जाते.त्यांना मान-सन्मान मिळाला पाहिजे, या भावनेतून फॅशन सुपरमॉडेल कार्यक्रम सुरू केला आहे, असे मत महाराष्ट्र नेक्स्ट फॅशन सुपर मॉडेल-2023 च्या (Maharashtra Next Fashion Super Model-2023) संस्थापिका रेश्मा बिपीन पाटील (Reshma Patil) यांनी व्यक्त केले.

 

 

 

रियान प्रॉडक्शनच्या वतीने महाराष्ट्र नेक्स्ट फॅशन सुपर मॉडेल मिस्टर, मिस, मिसेस, किड्स-2023 फॅशन शोचे (Maharashtra Next Fashion Super Model Mr, Miss, Mrs, Kids-2023 Fashion Show) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दिग्दर्शक शंकर भडकवाड (Directed by Shankar Bhadakwad) यांनी केले होते. विमान नगर नोव्हेटल हॉटेल येथे झालेल्या या शो मध्ये 50 हून अधिक मॉडेल्सनी सहभाग घेतला होता.

 

 

याप्रसंगी अभिनेता आदिनाथ कोठरे, श्रेयश जाधव, सुशांत पुजारी, दीपक मानकर, गिरीश मानकर, आहान देवाडिगा, रियान प्रॉडक्शनचे ब्रँड अॅम्बेसेडर रोहित शिंदे, किरण नाईकडे-पाटील, रियान पाटील उपस्थित होते.

 

 

ज्युरीमध्ये पंकज शर्मा, रोहित शिंदे मिताली धूत, अक्षय अधिक, प्रसिध्दी पोटे, आशिष शिंदे, शिवस्टॉपर हृषिकेश कांबळे नील आणि नीलिमा अवसरमोल, वैदेही, निधी अग्रवाल आणि अँगल भारद्वाज यांनी रॅम्प वॉकरमध्ये उत्तम कामगिरी बजावली. या शोमध्ये 45 स्पर्धकांमधून पंकज शर्मा, रोहित शिंदे, वैभव बच्चे, मितली धूत आणि अक्षय मोरे यांनी 12 विजेत्यांची निवड केली.

 

 

बुधवार पेठेतील रेड लाईट एरिया मध्ये अलका फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. तसेच पुणे मनपाच्या समाज विकास विभागात समूह संघटिका म्हणून काम करत आहे. रीयान च्या माध्यमातून नव्याने हे व्यासपीठ मिळाल्याचे अलका गुंजनाळ यांनी सांगितले.

Local ad 1