(Lockdown will have to be done in Nanded district : Collector) नांदेड जिल्ह्यात लाॅकडाऊन करावा लागणार : जिल्हाधिकारी

नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वांनाच चिंतेत घाणारी असून,  त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  कडक लॉकडाउन करावे लागणार या भुमिकेपर्यत स्थानिक प्रशासन आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली. (Lockdown will have to be done in Nanded district: Collector)

दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढती संख्या लक्षात जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक बोलावली आहे. त्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. (Lockdown will have to be done in Nanded district: Collector)

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पहाता लाॅकडाऊन लागणार याची चर्चा होत आहे. त्याविषयी बोलताना जिल्हाधिकारी डाॅ. इटनकर म्हणाले,  लगेच लॉकडाउनची घोषणा केल्यास  गोंधळाची परिस्थिती होईल. त्यामुळे लॉकडाउनची घोषणा एक दोन दिवसाचा आवधी ठेवूनच केली जाणार आहे. त्यासंदर्भात आदेश जारी केला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सांगितले.  (Lockdown will have to be done in Nanded district: Collector)

Local ad 1