तहसीलदार किरण अंबेकर, बालाजी शेवाळे यांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती

पुणे : राज्य शासनाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आदेशाने राज्यातील 58 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती (Promotion of 58 Tehsildars to the post of Deputy Collectors) देण्यात आली. परंतु विभागीय चौकशी (Departmental Inquiry) सुरु असल्याने तहसीलदार किरण अंबेकर (Tehsildar Kiran Ambekar) आणि बालाजी शेवाळे (Tehsildar Balaji Shewale)  यांना त्यातून वगळण्यात आले होते. मात्र, हे दोघेही विभागीय चौकशीतून निर्दोष मुक्त झाले. त्यामुळे त्यांना उपजिल्हाधिकारी पदी तात्पुर्ती पदोन्नती देण्यात आली. (Tehsildar Kiran Ambekar and Balaji Shewale have been promoted to the post of Deputy Collectors)

 

 

राज्याच्या महसूल विभागातील 58 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली. त्या अधिकाऱ्यांना पदस्थापनाही देण्यात आली. मात्र, ज्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरु होती, अशा तहसीलदारांना पदोन्नती देण्यात आली नाही. मात्र, आरोपातून दोषमुक्त झाल्यास त्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. किरण चंद्रकांत आंबेकर आणि बालाजी अर्जून शेवाळे यांची विभागीय चौकशी सुरु होती. या चौकशीतून दोघेही दोषमुक्त झाले आहेत. त्यामुळे यांना उपजिल्हाधिकारी (गट-अ) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश महाराष्ट्र शासनाने उपसचिव माधीव वीर यांनी जारी केले आहेत.

 

 

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (Gazetted – Non-Gazetted) या पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटपाबाबत 14 जुलै 2021 रोजी जारी केलेली शसान अधिसूचना विचारात घेऊन महूसल विभाग वाटपाचे व पदस्थापनचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले जाणार आहेत. (Tehsildar Kiran Ambekar, Balaji Shewale promoted to the post of Deputy Collector)

Local ad 1