डाॅ. रामोड यांचा येरवडा तुरुंगातील मुक्काम वाढला ; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

पुणे : भूसंपादनाचा मोबदला वाढवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारता अटक असलेले पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डाॅ. अनिल रामोड (Pune Divisional Additional Commissioner Dr. Anil Ramod) यांचा जामिन अर्ज सीबीआय विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. (Dr. Anil Ramod’s bail was rejected by the court) त्यामुळे डाॅ. रामोड यांच्या अडचणीत वाढ झाली असून, येरवडा तुरुंगातील मुक्कामही वाढला आहे. (Additional Commissioner Dr. Anil Ramod’s bail application rejected)

 

 

न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) दिल्यामुळे जामिनासाठी अर्ज करण्याचा डाॅ. रामोड यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार डाॅ. रामोड यांनी आपल्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. जामिन अर्जावर शुक्रवारी सरकारी वकील आणि बचव पक्षाच्या वकिलाध्ये युक्तीवाद झाला, त्यात सीबीआयच्या (CBI) वकिलांनी जामिनाला विरोध केला. डाॅ. रामोड यांनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, ते वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना जामिन दिल्यास सीबीआयला पुरावे गोळा करण्यास अडचण येऊ शकते. तसेच पुराव्यांशी छेडछाडही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते साक्षिदारावर दबावही आणू शकतात, असा युक्तीवाद केला. त्यावर डाॅ. रामोड यांच्या वकिलाने मुद्देमाल हस्तगत झालेला आहे. डाॅ. रामोड चौकशीसाठी कधीही हजर राहू शकतात. त्यामुळे जामिन मिळावा, असा युक्तीवाद केला. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकूण न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला.

 

डॉ. रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Bribery Division of the Central Crime Investigation Department) पथकाने 9 जून रोजी रंगेहात पकडले होते. त्यानंतर, सुरुवातीस तीन दिवसांची सीबीआय कोठडी व त्यानंतर 27 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. रामोड यांनी अ‍ॅड. सुधीर शहा (Adv. Sudhir Shah) यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. (Additional Commissioner Dr. Anil Ramod’s bail application rejected)

 

काय आहे प्रकरण

राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यासाठी विभागीय आयुक्त डाॅ.अनिल रामोड यांनी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यात तडजोडीनंतर आठ लाख रुपये स्विकारताना सीबीआयच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर सीबीआयने टाकलेल्या छाप्यांमध्ये घरातून 6 कोटी 64 आणि कार्यालयातून 1 लाख 28 हजार रुपये जप्त केले. तसेच डाॅ. रामोड यांच्या कुटुंबियांच्या नावावर विविध स्थावर मालमत्ता असून, त्याची किमंत सुमारे 5 कोटी 30 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. (Additional Commissioner Dr. Anil Ramod’s bail application rejected)

 

Local ad 1