पुणेकरांच्या रोषामुळे “त्या” निर्णयाला स्थगिती !
आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र कायम रहाणार
पुणे : पुणे आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसारभारती कडून घेण्यात होता. या निर्णयाविरोधात पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Union Information and Broadcasting Minister Anurag Thakur) यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. यासंदर्भात एक पत्रक देखील जारी करण्यात आले आहे. (The regional newsletter of Akashvani Pune center will continue)
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी तात्काळ याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्र लिहून सदर निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे. (The regional newsletter of Akashvani Pune center will continue)
आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन प्रक्षेपण होणारे प्रादेशिक बातमीपत्र बंद करु नये, यासाठी आज सकाळीच मी केंद्रीय मंत्री अनुरागजी ठाकूर यांना पत्र लिहून विनंती केली होती. पुणेकर आणि लोकभावनेचा आदर करुन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे… pic.twitter.com/FIQRwn5a3d
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 15, 2023
पुणेकर आणि लोकभावनेचा आदर करुन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्याबद्दल अनुराग ठाकूर यांचे मनापासून आभारी असल्याचे पाटील यांनी ट्विट करून म्हंटल आहे.
काँग्रेसच्या मागणीला यश, कायमस्वरूपी अधिकारी नेमा : मोहन जोशी
पुणे आकाशवाणी केंद्राचे वृत्त विभाग केंद्र बंद करण्याच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परंतु पुणेकर जनतेचा असलेला रोष व काँग्रेसने केलेली मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनी केलेली ही तात्पुरती मलमपट्टी आहे. पुणेकरांना स्थगिती नको निर्णय कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे, केंद्र सरकारने भारतीय माहिती सेवेतील सक्षम अधिकाऱ्याची येथे नेमणूक करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Maharashtra Pradesh Congress Vice President Mohan Joshi) यांनी केली आहे.