Nashik Bribe Crime । नाशिक : हॉटेलमध्ये बालकामगार (child labour) असून, बालकामगार नसल्याचा अहवाल तयार करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करुन ते स्विकारताना ला. प्र. विभागाच्या पथकाने व्यवसाय – दुकाने महिला निरीक्षकास अटक केली. त्यामुळे नाशिक येथील कामगार उपायुक्त कार्यालयात (Office of the Deputy Commissioner of Labor at Nashik) खळबळ उडाली आहे. (Shop inspector caught by ACB while accepting bribe of Rs.5000)
निशा बाळासाहेब आढाव (वय 53 वर्ष व्यवसाय – दुकाने निरीक्षक, श्रेणी 1, वर्ग 3 कामगार उपायुक्त कार्यालय,उद्योग भवन, आकाशवाणी टॉवर, तिरुपती टाऊन, फ्लॅट नंबर 17, गंगापूर रोड, नाशिक) असे लाच घेताना अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. (Shop inspector caught by ACB while accepting bribe of Rs.5000)
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे नाशिकमध्ये हाॅटेल आहे. या हाॅटेलवर आरोपी निशा आढाव यांनी 13 जून रोजी भेट जेऊन पहाणी केली. तुमच्या येथे बालकामगार आहे. त्यामुळे गुन्हा दाखल न करणे आणि अहवाल निरंक पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच पंचासमक्ष कामगार उपायुक्त कार्यालय, नाशिक येथे स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अटक केली. या संदर्भात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक, माधव रेड्डी आणि पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार आणि अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनात सापळा लाण्यात आला होता. या पथकात पो. ना. मनोज पाटील, पो. ना. अजय गरुड, म.पो.शि. शितल सूर्यवंशी यांचा समावेश होता. लाच मागितल्यास संपर्क करा कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.