Pune Municipal Corporation। शहरातील पावसाळी पूर्व कामे पुर्ण !

पुणे : पावसाळ्यात शहरात जागो-जागी पाणी साचून अनेकांच्या घरात पाणी शिरते. त्यामुळे राज्य शासनाने पावसाळ्या पुर्वी नाला साफसफाई करणे, नाला रूंदीकरण व खोलीकरण करणे, पावसाळी लाईन व चेंबर्स साफसफाई (Gutter Cleaning, Gutter Widening, Deepening, Rainy Line, Cleaning Chambers) करुन घ्या, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार आवश्यक कामे झाली आहेत,असा दावा पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

 

 

पुणे महानगरपालिकेमार्फत नाल्यामधील ९५ क्रिटिकल स्पॉट (95 critical spot in the drain) असून, त्यांची साफसफाई करण्यात आली. ३८२ कल्व्हर्टसची (382 Culvertus) साफसफाई पुर्ण झाली आहे. एकुण नाल्यांच्या लाबी पैकी आवश्यक असणारी १६५ कि. मी लांबीच्या नाल्यांची साफसफाई व गाळ काढणे व काही ठिकाणी खोलीकरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

 

शहरातील रस्त्यावर पावसाळ्यात पारणी सांचू नये, यासाठी दक्षता घेण्यात येत असून, अस्तित्वातील चेंबर पैकी आवश्यक असणारे ४८ हजार चेबर्समधील गाळ काढला असून १८४ कि. मी लांबीच्या पावसाळी लाईन साफ करण्यात आलेल्या आहेत. तसेच रस्त्यावर पाणी साचु नये म्हणुन पफुटपाथचे कड़ेने नवीन पावसाळी चेंबर्स तयार करून पावसाळी लाईनला जोडण्याची कामे केले जात आहे. आशा प्रकारे क्रिटीकल स्पॉट, कल्व्हर्ट, नाले साफसफाई व स्टॉर्म वॉटर चेंबर्स व नलिका आवश्यकतेनुसार सर्व साफसफाईची कामे पुर्ण करण्यात आलेली आहे.

 

..तर येथे करा संपर्क

पावसाळा कालावधी मध्ये देखील ही साफ सफाईची कार्यवाही सुरू राहणार आहे. याकरीता पुणे मनपा भवन येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला असून त्यासाठी फोन नें. १)९६८९९३०५३१ , ९६८९९३५४६२ या नंबर व्हॉटसअप द्वारे २४४७ नागरिकांना तक्रार नोंदविता येणार आहे.

Local ad 1