Gautami Patil । नांदेडकरांना पाहता येणार गौतमी पाटीलचा जलवा !

Gautami Patil ।नांदेड जिल्ह्यातील गौतमी पाटीलचा शनिवारी पहिलाच कार्यक्रम

Gautami Patil । नांदेड : आपल्या नृत्याच्या स्टाईल मुळे चर्चेत असलेली प्रसिद्ध नृत्यागंणा गौतमी पाटील (Gautami Patil latest marathi news) ही नांदेड जिल्ह्यात येणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना गौतमी पाटीलचा (Gautami Patil) जलवा पाहता येणार आहे. गेल्या काही महिन्यात गोतमी पाटील कधी आडनाव, कधी नृत्याची स्टाईल तर कधी आपल्या टिकाकारांना दिलेल्या उत्तरामुळे ती प्रसिद्धी झोतात आली. ती येत्या शनिवारी नांदेंड जिल्ह्यात पहिल्यांदाचा येत आहे.

 

 

 

नांदेड जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख आकाश रेड्डी येताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी दि.17 जून रोजी धर्माबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील आणि टिम नृत्य सादर करणार आहे. हा कार्यक्रम आकाश भाऊ रेड्डी मित्र परिवाराने आयोजित केला असून, सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. मी येत आहे, तुम्ही नक्की, या असे आवाहन गौतमी पाटील हिने व्हिडीओdharmabad newsच्या माध्यमातून केले आहे.

 

Navi Mumbai Acb Trap। उरण पोलिस ठाण्यातील महिला पीएसआयला 50 हजारांची लाच घेताना अटक

 

राज्यात विविध ठिकाणी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नांदेड जिल्ह्यात ती प्रथमच येत असल्याने धर्माबाद येथील कार्यक्रमातही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

 

 

प्रसिद्ध डिजे अजिस अनुभवता येणार

धर्माबाद येथील गोतमी पाटील हिच्या नृत्याविष्काराबरोबरच नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला डिजे अजिसचा (DJ Ajis) डिजे अनुभवता येणार आहे. त्यामध्ये डिजेसह सांउड सिस्टिम आणि लाईट डेकोरेशन लक्ष वेधून घेईल.

 

 

व्हिडीओ संदेश

Local ad 1