Expansion of the State Cabinet । महाविकास आघाडी सरकार उलथून राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सुरुवातील काही मंत्र्यांसोबत शपथ घेतली. त्यानंतर सुमारे एक महिन्यांनी पहिला विस्तार झाला. आता लांबलेला दुसरा विस्तार (Expansion of the State Cabinet) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. आता लवकरच शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आताच्या मंत्रीमंडळ विस्तारत भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) तर दोन हे राज्यमंत्री (Minister of State) आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदर राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे. (Expansion of the State Cabinet)