sub registrar office chakan pune । चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला आग

डाटा सुरक्षित असल्याचा प्रशासनाचा दावा

sub registrar office chakan pune पुणे : चाकण-शिक्रापूर मार्गावरील दुय्यम निबंधक कार्यालयाला (Sub Registrar Office on Chakan-Shikrapur Road) रविवारी (दि.4) आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत प्रिंटर, स्कॅनर, आणि संगणक  (Printers, scanners, and computers) जळून खाक झाले. मात्र दस्त नोंदणीचा डाटा सुरक्षित असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली.

चाकण शिक्रापूर मार्गावरील विशाल गार्डन या गृहप्रकल्पात शासकीय दुय्यम निबंधक कार्यालय आहे. गृहप्रकल्प, जागांच्या दस्तांची नोंदणी, भाडेकरार, बक्षीसपत्र आणि इतर दस्त नोंदणीचे कामे (Housing project, land title registration, tenancy agreement, award certificate and other title registration works)  केली जातात. रविवारी सुट्टीच्या दिवशी कार्यालयाला आग लागल्याचे स्थानिकांकडून कळाले. विशेषत: जुन्या दस्त संगणकीकृत करण्यात येत असून या दस्तांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. उर्वरित दस्त सुरक्षित असल्याने कागदपत्रांचे कुठलेही नुकसान झालेले नाही, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली.

 

दस्त नोंदणी करताच सर्व कागदपत्रांचा (डाटा) थेट विभागाच्या सर्व्हरमध्ये संगणकीकृत करण्यात आला असल्याने नुकसान टळले आहे. येत्या दोन दिवसात कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम करून दस्त नोंदणीचे काम पूर्ववत केले जाईल, असेही सांगण्यात आले.

 

दुय्यम निबंधक कार्यालयात दैनंदिन होणार्‍या कामकाजाचा विदा (डाटा) तत्काळ विभागाच्या आय सरिता सर्व्हरमध्ये येतो. तसेच 24 तासांच्या आत दस्तांचा डाटा देखील संगणकीकृत करण्याचे आदेश असल्याने कुठल्याही माहिती आगीत जळून नुकसान झालेले नाही, असे सांगण्यात आले. (sub registrar office chakan pune)

Local ad 1