(Police offered a helping hand to the burnt traders) जळीतग्रस्त व्यापाऱ्यांना लष्कर पोलीसांनी दिला मदतीचा हात
पुणे : पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये लागलेल्या आगीत 25 दुकाने जळून खाक झाली आहेत. व्यापारी मदतीच्या प्रतिक्षेत असून, या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना लष्कर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. (Police offered a helping hand to the burnt traders)
लष्कर पोलीस ठाण्यातील संवाद सभागृहात परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंजूर शेख यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. (Police offered a helping hand to the burnt traders)
यावेळी लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कविदास जांभळे, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, संघटनेचे कार्याध्यक्ष शंकर सुर्वे, उपाध्यक्ष शशिकांत परदेशी, खजिनदार सागर वांजळे, उपखजिनदार वाहीद शेख, सचिव आतिश परदेशी, तौसीफ शेख, फुरकान शेख, अय्युब लाला व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (Police offered a helping hand to the burnt traders)
लष्कर पोलीस कायमच व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांनी केले. (Police offered a helping hand to the burnt traders)
छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अशा संकट काळात त्यांना पोलीसांकडून सामाजिक भावनेतून छोटीशी आर्थिक मदत करण्यात आली, असे पोलीस उपायुक्त सागर पाटील साहेब यांनी सांगितले. या मदतीसाठी व्यापाऱ्यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष मंजूर शेख यांनी आभार मानले. (Police offered a helping hand to the burnt traders)