कंधार : आरक्षित जागेवर निवडून आलेल्या नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 383 सदस्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र (caste validity certificate maharashtra) विहित मुदतीत सादर केले नाही. तसेच त्यांना संधी देवूनही ते आपल्या प्रमाणपत्राची वैधता सादर करू शकले नाही. अशा 1 हजार 383 उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Nanded Abhijeet Raut) यांनी रद्द केली आहे. त्यात कंधार तालुक्यातील 91 सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये धानोरा आणि तेलूर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि चौकी महाकाया ग्रामपंचायतीचे उपसरपंच अपात्र ठरले आहेत. या संदर्भातील एक आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (91 gram panchayat members of Kandahar taluka were disqualified)
निवडणूक आले अन् निर्धास्त झाले
काय म्हणतो कायदा
महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1-अ) अन्वये (Under Section 10 (1-A) of the Maharashtra Gram Panchayat Act, 1958) जे उमेदवार आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर करतील त्या उमेदवारांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. (91 gram panchayat members Kandahar taluka disqualified)
अपात्र ठरलेल्या सदस्यंची यादी पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा