UPSC Exam Result 2022। यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा डंका ; गुणवंत विद्यार्थी कोण आहेत जाणून घ्या 

UPSC Exam Result 2022 ।  : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022मध्ये घेतलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्राचा टक्का वाढला असून, या परीक्षेत 70 पेक्षा अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत (upsc exam result 2022 topper list) झळकले आहेत. ( UPSC Exam Result 2022 Maharashtra Students Success in UPSC Exam)

UPSC च्या अंतिम यादीत सारथीचे १७ विद्यार्थी चमकले

यूपीएससी परीक्षा ही जगातील कठीण पहिल्या पाच परीक्षा पैकी एक परीक्षा मानली जाते.  दरवर्षी या परीक्षेत महाराष्ट्रातून पंधरा ते वीस विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याचे आजपर्यंतच्या निकालावरून दिसून येते. मात्र, यंदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (UPSC Exam Result 2022 Maharashtra Students Success in UPSC Exam)

UPSC Exam Result 2022 Maharashtra Students Success in UPSC Exam

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Chief Minister Eknath Shinde) अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे (UPSC Exam Dr. Kashmiri Number Topper) यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. डॉ. संखे यांच्यासह यशस्वी उमेदवारांना त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.’सारथी’ संस्थेच्या माध्यमातून या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनीही लक्षणीय आणि घवघवीत यश मिळवले आहे, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे. (Maharashtra Students Success in UPSC Exam)

UPSC च्या अंतिम यादीत सारथीचे १७ विद्यार्थी चमकले

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. त्यात छत्रपती शाहू महाराज  संशोधन, प्रशिक्षण  व मानव विकास संस्था (सारथी) पुणे संस्थेचे प्रायोजित 17 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, अशी माहिती सारथी चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (Sarathi Managing Director Ashok Kakade) यांनी दिली. (UPSC Exam Result 2022 Maharashtra Students Success in UPSC Exam)
Local ad 1