Nashik ACB Trap । दहा हजारांची लाच स्वीकारणारी जिल्हा हिवताप अधिकारी ACB जाळ्यात

Nashik ACB Trap : वैद्यकीय रजेवरुन कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्याचे वेतन काढण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारताना जिल्हा हिवताप अधिकारी आणि दोन आरोग्य सेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. (District Hivatap officer arrested for accepting bribe of ten thousand)

 

जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली दगडू पाटील (District Winter Officer Vaishali Dagdu Patil) (वय- 49 वर्ष, रा.स्टेटस रेसिडेन्सी गंगापूर,नाशिक), आरोग्य सेवक  संजय रामू राव (वय-46 वर्ष, रा. पाथर्डी फाटा आणि आरोग्य सेवक कैलास गंगाधर शिंदे (वय-47 वर्ष रा. पांडव नगरी, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपिंचे नाव आहे. (District Hivatap officer arrested for accepting bribe of ten thousand)

नाशिक लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे आजारी असल्याने सुट्टीवर होते. त्यानंतर कामावर रूजू झाले. सुट्टी काळातील वेतन काढण्यासाठी अर्ज केला होता. जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील हिने 15  मे  रोजी 10 हजार  रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारन्यास प्रोत्साहन दिले. आरोपी आरोग्य सेवक संजय रामू राव, याने दि.15 मे रोजी लाचेची मागणी करुन कैलास गंगाधर शिंदेला स्वीकारण्यास सांगितले. त्यानुसार शिंदे लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

 

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (Superintendent of Police Sharmistha Gharge-Walawalkar), अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Upper Superintendent of Police Narayan Nyhalde), पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (Deputy Superintendent of Police Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पोलीस निरीक्षक साधना इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. (District Hivatap officer arrested for accepting bribe of ten thousand)

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी  अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Local ad 1