पुणे । राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण नवी दिल्ली (National Legal Services Authority New Delhi) व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई (Maharashtra State Legal Services Authority High Court Mumbai) यांच्या निर्देशांनुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक (District Judge Shyam Chandak) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पुणे जिल्ह्याने प्रलंबित १६ हजार ६४६ आणि दाखलपूर्व १ लाख २ हजार ११९ अशी एकूण १ लाख २१ हजार १७७ प्रकरणे निकाली काढून महाराष्ट्रात सलग दहाव्यांदा प्रथम स्थान मिळवले आहे. (Pune district remains at the first position in Maharashtra in settling cases in Lok Adalat)
या लोकन्यायालयामध्ये एकूण ५९ हजार ३१७ प्रलंबित व एकूण १ लाख ५५ हजार ७५७ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांतील ८ प्रकरणात सामंजस्याने तडजोड करुन त्यातील पती पत्नी दोन्ही पक्षकार आनंदाने नांदण्यास तयार झाले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव मंगल कश्यप यांनी दिली. (Pune district remains at the first position in Maharashtra in settling cases in Lok Adalat)