नांदेड : ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या काठावरची समृद्धी अधिक प्रवाहित होत असते. तिच्या काठावरची गावातही समृद्धी प्रत्ययास येते. नदीला ज्या गावकुशीमध्ये स्वातंत्र्य असते तेथील समाजही अधिक प्रगल्भ व सभ्यता बाळगून असतो. मात्र जिथे नदीला स्वातंत्र्य उरत नाही तिचे तिथे समाजालाही उजाडपण येते या शब्दात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा (Dr. Rajendra Singh Rana) यांनी नदीच्या अस्तिवाप्रती वास्तवाचे भान आणून दिले. “चला जाणुया नदीला” (Let’s go to the river) या अभियानांतर्गत देगलूर तालुक्यातील शहापूर येथे आयोजित जलग्राम सभेत ते बोलत होते.(It is possible to revive Manyad river through public participation)
चार महिन्यात 400 लाचखोरांना एसीबीचा दणका, लाचखोरीची 280 प्रकरणे उघड