सात बारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी करणारी महिला तलाठीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (woman Talathi who demanded a bribe of twenty thousand)
➡ युनिट : परभणी
➡ तक्रारदार : पुरुष, वय 41 वर्षे
➡ आरोपी लोकसेविका:- शिल्पा किशनराव घाटोळ पद – तलाठी सज्जा- रुमणा (जवळा) ता- गंगाखेड जि. परभणी (वर्ग -3) .
➡ तक्रार प्राप्त : दि. 21/03/2023
➡ लाच मागणी पडताळणी : दि. 21/03/2023
➡ लाचेची मागणी रक्कम: 20,000/- रु.
➡ थोडक्यात हकिकत
यातील तक्रारदार यांचे आईस मा.न्यायालयाचे आदेशाने त्यांचे वडिलोपार्जित शेत जमिनीचा हिस्सा भेटल्याने त्या शेत जमिनी च्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार च्या आईचे नाव लावून फेरफार नोंद करण्याच्या कामांसाठी लोकसेविका घाटोळ यांनी पंचासमक्ष 20,000 रुपये लाचेची मागणी केलेली आहे. यातील आरोपी लोकसेविका यांचे विरुद्ध पोलीस ठाणे नवामोंढा, परभणी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (woman Talathi who demanded a bribe of twenty thousand)
➡ मार्गदर्शक: डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड.
➡ सापळा पथक
किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, पोनि सदानंद वाघमारे, पोनि बसवेश्वर जकीकोरे, पोह चंद्रशेखर निलपत्रेवार, पोह मिलिंद हनुमंते, पोशि शेख मुख्तार, पोशि चालक पोह जनार्धन कदम, अँटी करप्शन ब्यूरो, परभणी
➡ तपास अधिकारी
बसवेश्वर जकीकोरे, पोलीस निरीक्षक,अँटी करप्शन ब्यूरो, परभणी.
परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर – 09623999944
किरण बिडवे, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, परभणी
मोबाईल नंबर – 07020224631
अँटी करप्शन ब्यूरो, परभणी कार्यालय दुरध्वनी – 02452-220597
टोल फ्रि क्रं. 1064