IPL 2023 । नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आयपीएल उद्घाटन सोहळा ; ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड तडका पाहायला मिळणार  

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 ला आजपासून (31 मार्च) सुरुवात होत आहे. यंदाच्या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात रंगणार आहे. (IPL 2023 The IPL opening ceremony will be held at the Narendra Modi Stadium)

 

 

 

आयपीएल 2023 (IPL 2023) चा उद्घाटन सोहळा शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. त्यानंतर यंदाच्या आयपीएल सीझनला सुरुवात होईल. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. उद्घाटन समारंभ आज (31 मार्च) संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल.

 

Whole Grains। भरड धान्याचे महत्व जाणून घेऊया !

 

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आणि गायक अरिजित सिंह (Arijit Singh) आयपीएलच्या (IPL 2023) उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत. याशिवाय कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) देखील उद्घाटन समारंभात परफॉर्म करताना दिसणार आहेत.

 

 

आयपीएलच्या 2023 उद्घाटन समारंभाचं थेट प्रक्षेपण (Live Streaming) तुम्हाला पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला लाईव्ह स्ट्रिमिंगवर पाहता येईल, जिओ सिनेमा अॅपवर तुम्ही हा सोहळा लाईव्ह पाहू शकता. (The IPL opening ceremony will be held at the Narendra Modi Stadium)

 

आयपीएलच्या 16 व्या सत्राचे आले वेळापत्रक, कधीपासून होणार आयपीएल जाणून घ्या..

 

अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलला उद्घाटन सोहळा म्हणजे ओपनिंग सेरेनमीसह (Opening Ceremony) सुरुवात होणार आहे. सुमारे पाच वर्षानंतर आयपीएलला ओपनिंग सेरेमनीसह सुरुवात होईल. त्यामुळे यंदा धूमधडाक्यात आयपीएलला सुरुवात होणार आहे. (The IPL opening ceremony will be held at the Narendra Modi Stadium)

Local ad 1