Earthquake। भारतासह नऊ देशात भूकंपाचे धक्के….

भारतातील अनेक राज्यातही भूकंप

Earthquake । : मंगळवारी रात्री दिल्लीसह (Delhi) आशियातील अनेक देशातील काही भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. या भूकंपामुळे तब्बल 40 सेकंद जमीन हादरली. त्यामुळे लोक घारबले आणि घराबाहेर पळाले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 एवढी नोंदवली गेली.  भूकंपाचा एपिसेंटर अफगाणिस्तानच्या फैजाबाद पासून 133 किमी अंतरावर दक्षिण पूर्वेकडे होता. भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत 56 किलोमीटरवर होते. (Earthquake shocks in nine countries including India)

 

 

भूकंपामुळे (Earthquake) अफगाणिस्तानात कोणतेही नुकसान झाले नाही. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 9 लोक ठार झाले आहेत. तर 186 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. खैबर पख्तूनख्वामध्ये भूकंपामुळे इमारत कोसळल्याने नऊ लोक दगावले आहेत. (Earthquake shocks in nine countries including India)

 

पुणे म्हाडाच्या तीन हजार सदनिकांची सोडत

भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान, कझाकिस्तान, चीन, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान आणि किर्गिस्तान देशात भूकंपाचे( Earthquake) धक्के जाणवले आहेत. (India, Pakistan, Afghanistan, Kazakhstan, China, Turkmenistan, Tajikistan, Uzbekistan and Kyrgyzstan)

 

भारतात कुठे कुठे झटके?

दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, दिल्लीत भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर रात्री हिमाचल प्रदेशातही 12 वाजून 51 मिनिटाने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी नोंदवली गेली. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, श्रीनगर, शिमला, मंडी, देहरादून, उत्तरकाशी, चमोली, मसूरी, अमृतसर, मोगा, भठिंडा, मानसा, पठानकोट, जालंधर, गुरदासपूर, होशियारपूर, मुरादाबाद, सहारनपुर, शामली, लखनऊ आदी ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. 30 सेकंदापर्यंत जमीन हादरली होती.

Local ad 1