Private Job : सध्या जुनी पेन्शनसाठी (Old Pension) राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी संपावर (Government and semi-government employees on strike) गेले आहेत. त्यातच आता राज्य सरकारने (privatization of government jobs) एक लाख नोकऱ्या खाजगी कंत्राटदारांमार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे. (The state government is preparing to fill one lakh posts on contract basis)
सरकारच्या या निर्णयाची उलट प्रतिक्रिया एमपीएससी ची (MPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उमटली आहे. खासगीकरणामुळे एमपीएससी मार्फत भरली जाणारी पदे कमी होणार असल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे. (The state government is preparing to fill one lakh posts on contract basis)