पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी डाॅ. भगवान पवार

पुणे ः जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग (Zilla Parishad Health Department) वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य निर्देशांकामध्ये अग्रेसर ठेवणारे डाॅ. भगवान पवार (Dr.Bhagwan Pawar)  यांची आता पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी (Head of Health, Pune Municipal Corporation)  नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश नगरविकास विभागाच्या उप सचिव प्रियंका कुलकर्णी यांनी जारी केला आहे. (Dr.Bhagwan Pawar appointed Health Chief of Pune Municipal Corporation)

 

 डॉ.आशिष भारती यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांची बदली करण्यात आली. तेव्हापासून महापालिका आरोग्य प्रमुख पादाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार डॉ. कल्पना बळीवंत यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर आता डॉ. भगवान पवार यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.  पुढील दोन-तीन दिवसांमध्ये डॉ. पवार पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. (Dr.Bhagwan Pawar appointed Health Chief of Pune Municipal Corporation)

 

 गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील अधिकाऱ्यांना आरोग्य प्रमुखपदी नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे डॉ. भारती यांच्या बदलीनंतर ही महापालिकेतील अधिकाऱ्यांना या पदावर नियुक्ती मिळावी यासाठी काही अधिकारी प्रयत्न करीत असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागातील काही अधिकारी देखील या पदासाठी इच्छुक होते. त्यामुळे कोणाची नियुक्ती होणार या विषयी जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात होती.

 

 

जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डाॅ. भगवान पवार यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रचार होईनये, यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले आहे. केलेल्या उपाययोजनांमुळे अनेक गावांत कोरोना पोहोचू शकला नाही. डाॅ. पवार सातारा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी असताना त्यांनी नकोशीला नाव देण्यासाठी केलेल्या कामाची दखल देशपातळीवर घेण्यात आली. (Dr.Bhagwan Pawar appointed Health Chief of Pune Municipal Corporation)

पुणेकरांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रयत्न

करोना काळात जिल्हा आरोग्य अधिकारी असताना चांगले काम केले. आता महापालिका आरोग्य प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यामुळे आनंद झाला. पुणे शहरातील नागिकांना महापालिका रुग्णालयांच्या माध्यमातून दर्जेदार वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आरोग्य निर्देशांकामध्ये वाढ करण्यासाठी ही प्रयत्न करणार आहे.

– डॉ. भगवान पवार,  पुणे महापालिका आरोग्य विभाग प्रमुख,

Local ad 1