मुंबईत कंटेनर अंगणवाडी केंद्र सुरु

मुंबई : जागेची टंचाई असलेल्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रासारख्या ठिकाणी  कंटेनर अंगणवाड्या ही उपयुक्त संकल्पना महिला व बाल विकास विभागामार्फत  राबविण्यात येत असून, बालक आणि पालकांसाठी ही अंगणवाडी निश्चितच सहायक ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) शुक्रवारी येथे सांगितले. (Container Anganwadi Center started in Mumbai)

 

 

 

विधानभवनात  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या (Chief Minister Eknath Shinde) हस्ते आज कंटेनर अंगणवाडी उपक्रमांतर्गत जानुपाडा,कांदिवली, पूर्व येथील कंटेनर अंगणवाडीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तसेच अंगणवाडी  दत्तक योजनेतंर्गत महिला व बाल विकास विभागाने भव्यता फाऊंडेशन आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या  इतर सामाजिक संस्था यांच्यासोबत सामंजस्य करारावर यावेळी  स्वाक्ष-या केल्या. तसेच एचडीएफसी बॅंक आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात पंधरा लक्ष वृक्ष लागवडीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. (Container Anganwadi Center started in Mumbai)

यावेळी महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई उपनगरचे  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित उपस्थित होते. (Container Anganwadi Center started in Mumbai)

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कंटेनर अंगणवाडी प्रमाणेच विभागामार्फत अंगणवाड्या दत्तक योजनेंतर्गत सुविधांयुक्त अंगणवाड्या उपलब्ध होत असून बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही उत्तम सुविधा आहे.यात अंगणवाडी सेविकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या कामाचे यावेळी कौतुक केले. तसेच एचडीएफसी बॅंक आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातील  पंधरा लक्ष वृक्ष लागवडीचा करार हा पर्यावरण विकासाच्यादृष्टीने महत्वाचा ठरणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाचे पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य असून या कराराच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मुंबईत वृक्ष लागवड करण्यात येईल,ही स्वागतार्ह बाब आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, मुंबईसारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाडी ही सुविधा माता, बालकांसाठी वरदान ठरेल. बालकांच्या पोषण-संगोपनात अंगणवाडीचे महत्व लक्षात घेऊन शासनाला राज्यभरातील सर्व अंगणवाड्या दर्जेदार करायच्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  अंगणवाड्यांकडे लक्ष देण्याची  सूचना  केली असून अंगणवाडी दत्तक योजनेच्या माध्यमातून अंगणवाड्यांची गुणवत्ता आणि सुविधा वृद्धिंगत करता येतील. भावी पिढी सुदृढ होण्यासाठी अंगणवाड्यांची भूमिका महत्त्वाची असून  महिला व बालकांच्या  विकासासाठी  विभाग सक्रियपणे काम करत असल्याचेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्यातील अंगणवाडी केंदांच्या बळकटीकरणाकरिता सीएसआर, सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांना शैक्षणिक सुविधा, वृध्दी संनियंत्रण साहित्य वाटप, प्रशिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य तपासणी करिता सहाय्य इत्यादी बाबींचा अंगणवाडी दत्तक योजनेत समावेश आहे. यामध्ये आतापर्यंत राज्यात एकूण ३६५६ अंगणवाडी केंद्र विविध कंपन्या, सामाजिक संस्था यांनी माहे ऑक्टोबर २०२२ पासून आजपर्यंत दत्तक घेतलेल्या आहेत.  (Container Anganwadi Center started in Mumbai)

कंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना

मुंबई मधील अंगणवाडी केंद्र प्रामुख्याने झोपडपट्टी क्षेत्रातील रहिवाश्यांच्या घरात भाडयाने चालविण्यात येतात. घरांचे क्षेत्रफळ छोटे असल्याने कंटेनरमध्ये अंगणवाडी सुरू करण्याची संकल्पना माहिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेली आहे. कंटेनर अंगणवाडी ठेवण्याकरिता २४९ रिकाम्या जागा शोधण्यात आलेल्या आहेत. पहिला कंटेनर बालविकास प्रकल्प, वरळी, कांदीवली येथील अंगणवाडी क्र.१०५ पांडे कंपाऊंड, जानुपाडा, कांदिवली- पूर्व या ठिकाणी आस्थापित करण्यात येऊन त्याचे ऑनलाईन उदघाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभ हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

Local ad 1