मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हं धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. (Raj Thackeray reacted by sharing the video of Balasaheb Thackeray’s voice)
केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय उद्धव ठाकरे यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर भाजप आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्वीट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. (Raj Thackeray reacted by sharing the video of Balasaheb Thackeray’s voice)
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं…. #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy pic.twitter.com/FxO3wprUUF
— Raj Thackeray (@RajThackeray) February 17, 2023
राज ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. (Raj Thackeray reacted by sharing the video of Balasaheb Thackeray’s voice)
काय आहे व्हिडिओत
नाव आणि पैसा
पैसा येतो, पैसा जातो
पुन्हा येतो…
पण एकदा का नाव गेलं की
परत येत नाही
ते येऊ शकत नाही
काळ्या बाजारासुद्धा मिळायचं नाही
म्हणून नावाला जपा
नाव मोठं करा
– शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे