विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोगाचा वॉच

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक (Kasba Peth and Chinchwad Assembly by-elections) सुरु असून, यात उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाचा हिशोब दररोज घेतला जात आहे. तसेच त्यांच्या सर्व खर्चावर विशेष लक्ष ठेवले जात असून, त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. (Election Commission’s watch on expenditure of candidates in Assembly by-elections)

 

 

आचारसंहिता काळात पैशाच्या उधळपट्टीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके, तपासणी नाके तसेच ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असते. परंतु, या पथकांच्या माध्यमातून काटेकोर अंमलबजावणी होणे शक्य नसल्याने आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, महानगरपालिका क्षेत्रिय अधिकारी या विभागांची मदत घेतली जात आहे. (Election Commission’s watch on expenditure of candidates in Assembly by-elections)

 

 

      कसबा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीसंदर्भात भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) तीन मतदान प्रक्रिया निरीक्षक (ऑब्जर्व्हर) पुण्यात आले आहेत. नीरज सेमवाल (सामान्य प्रशासन) आश्‍विनी कुमार (पोलीस प्रशासन) तर मंझरूल हसन (महसूल) असे तीन निवडणूक निरीक्षक पुण्यात आले असून त्यांकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. (Election Commission’s watch on expenditure of candidates in Assembly by-elections)

 

  महसूल प्रशासनासंदर्भात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या तपशीलांचा आढावा घेण्यात आला आहे. यावेळी प्रत्यक्ष उमेदवार उपस्थित असून आयकर विभाग आणि उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी देखील उपस्थित होते, तर दोन टप्प्यातील ताळेबंद 20 आणि 24 फेब्रुवारी रोजी तपासण्यात येणार आहे. (Election Commission’s watch on expenditure of candidates in Assembly by-elections)

 

   कसबा विधानसभा मतदारसंघात शनिवार वाडा, दांडेकर पूल आणि स्वारगेट या ठिकाणी तपासणी पथके (सर्व्हीलन्स टीम) तैनात करण्यात आले आहेत. तीन ठिकाणी एक पोलिस कर्मचारी, एक तपासणी अधिकारी, छायाचित्रिकरण करण्यासाठी एक व्यक्ती आणि एक निवडणूक विभागातील कर्मचारी असे चार व्यक्ती येणार्‍या जाणार्‍या वाहनांची तपसणी करत आहेत.
Local ad 1