मुंबई : रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant warise) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वारिसे यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. (Major updates in the death case of journalist Shashikant Warise)