CIBIL स्कोअर म्हणजे काय? कर्ज घेण्यासाठी CIBIL स्कोअरचे किती महत्वाचा, जाणून घेऊया…

CIBIL । तुमचा CIBIL स्कोर म्हणजेच, क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तरच तुम्हाला गृहकर्जाच्या (Home Loan) सुरुवातीच्या व्याजदरावर कर्ज मिळते. CIBIL स्कोअर 300 ते 900 पॉइंट्स दरम्यान मोजला जातो. जर तुमचा CIBIL स्कोर किमान 750 च्यावर असेल, तरच बँकांचा कर्ज सहज देतात. बँका देखील सुरुवातीच्या व्याजदरावर कर्ज (Home Loan) देतात. CIBIL सुधारण्यासाठी, तुम्हाला आर्थिक व्यवहार नियंमांच्या अंतर्गत करावे लागतात. (What is CIBIL Score? Let’s know how important CIBIL score is for taking a loan.)

 

 

सिबिल स्कोअर (Cibil score) हा तुमच्या तुमच्या आर्थिक देवाण-घेवाणाची (Credit History) माहिती दर्शवतो. ट्रान्स युनियन सिबिल लिमिडेट द्वारे सिबिल स्कोअर तयार केला जातो. याला पूर्वी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणून ओळखले जात होते. तुम्हाला गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड घ्यायचे असल्यास बँकांकडून सिबिल स्कोअर तपासला जातो.सिबिल स्कोअर चांगला असेल तरच कर्ज सहज मिळू शकतो. जर आपला सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर आपल्याला बँका किंवा एनबीएफसी यांच्याकडून कर्ज घेण्यास अडचणी येतात. (What is CIBIL Score? Let’s know how important CIBIL score is for taking a loan.)

 

 

 

जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला असेल तर त्याचा हफ्ता वेळेवर भरा. वेळेवर हफ्ता भरल्यास तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यास मदत होते. चांगला क्रेडिट स्कोअर मिळवण्यासाठी तुमचा क्रेडिट वापर हा एकूण उत्पन्नाच्या ३० टक्के इतक्यांपर्यंतच असावा. (What is CIBIL Score? Let’s know how important CIBIL score is for taking a loan.)

 

 

सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी टिप्स 

सिबिल स्कोअर हा चांगला असल्यास तुम्हाला आवश्यक असलेले कर्ज मंजुर होण्यास मदत होते. तुम्हाला आपल्या सिबिल स्कोअरे परीक्षण करु इच्छित असल्यास तुम्ही तो तपासून घेऊ शकता. आपल्या क्रेडिट अहवालात त्रुटी मुक्त राहण्यासाठी नियमित स्कोअरचे परीक्षण केले पाहिजे. जर आपल्याला रिपोर्टमध्ये काही चूक आढळली तर त्याचे पुनरावलोकन वेळेत दुरुस्त करावे. आपल्या क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करु नये आणि त्याची खात्री करुन घ्यावी. जर तुम्हाला सिबिल स्कोअर ७५० पर्यंत ठेवायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ५० टक्क्यांहून अधिक खर्च करणे टाळा. चांगला सिबिल स्कोअर ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते भरा. उशीरा पेमेंट टाळा. अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो.

Local ad 1