पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी १९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. (Invitation to apply online for animal husbandry department schemes)
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे. (Invitation to apply online for animal husbandry department schemes)
इच्छुकांनी https://ah.mahabms.com/webui/
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असल्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्ज केल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक बदलणार नाही याची दक्षता घ्यावी. (Invitation to apply online for animal husbandry department schemes)
अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (Invitation to apply online for animal husbandry department schemes)