पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) घेतली. या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचा 95.81 टक्के लागला आहे. (95.81 percent of Class X; The announcement will be made online at 1 pm)
सोमवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह ६ ठिकाणी निकाल पाहता येईल. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.
दहाविच्या विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण ऑनलाइन निकालात पाहता येतील. तसंच निकालीची छापील प्रतही विद्यार्थ्यांना मिळू शकेल. https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर माहिती सविस्तर उपलब्ध होईल. शाळा आणि संस्थांसाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल पाहता येणार आहे.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ आहे.
२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,७७० पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३२७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.१६ आहे.
३. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,८९४ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ आहे.
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०७८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८४६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२५ आहे. ५
. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, पुनर्परिक्षार्थी व खाजगी मिळून एकूण १६,११,८१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६,००,०२१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,१७,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८६ आहे.
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९९.०१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९४.७३%) आहे.
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ ने जास्त आहे.
८. एकूण १८ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
९. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५,५८,०२१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५,३१,८२२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,१४,८६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ७९,७३२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
१०. राज्यातील २३,२८८ माध्यमिक शाळांतून १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,३८२ शाळांचा निकाल १०० % लागला आहे