हे खरं आहे..! ३४ लाख वीजग्राहकांना व्याजापोटी मिळाले ८० कोटी रुपये !

३४ लाख वीजग्राहकांना व्याजापोटी मिळाले ८० कोटी रुपये

पुणे : महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे वहवेली (Pune, Pimpri-Chinchwad City, Ambegaon, Junnar, Khed, Maval, Mulshi, Velhe, Haveli) तालुक्यातील ३४ लाख ४६ हजार ९७८ लघु व उच्चदाब वीजग्राहकांना ७९ कोटी ९६ लाख ३६ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे. (80 crore as interest refund to 34 lakh electricity consumers)

 

 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (Maharashtra Electricity Regulatory Commission) विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसारआर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) दराच्या सममूल्य दरानेव्याजाची रक्कम वीज बिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

 

महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोेधात गुन्हा दाखल

 

तसेच विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन २०२२-२३ मध्ये पुणे परिमंडलातील ३४ लाख ४६ हजार ९७८ लघु व उच्चदाब वीजग्राहकांना ७९कोटी ९६ लाख ३६ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. कृषि पंपधारक वीजग्राहकांना त्रैमासिक वीजबिल देण्यात येत असल्याने त्यांच्या येत्या जून महिन्याच्या वीजबिलात परताव्याची रक्कम समायोजित करण्यात येणार आहे.

 

वीज बिलामध्ये समायोजित

लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ३४ लाख ४१हजार ५७५ वीजग्राहकांना ३९ कोटी २० लाख रूपयांचा परतावा देण्यात आला आहे. यामध्येपुणे शहरातील १७ लाख ८४ हजार ३६ ग्राहकांना २१ कोटी ६० लाख ९० हजार रुपयांचा, पिंपरी व चिंचवड शहरातील ७ लाख ८८ हजार ९१० वीजग्राहकांना ९ कोटी २२ लाख ८७ हजारतर आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हेव हवेली तालुक्यातील ८ लाख ६८ हजार ६२९ ग्राहकांना ८ कोटी ३६ लाख २२ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. तसेच पुणे परिमंडलातील उच्चदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक तसेच इतर ५ हजार ४०३ वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी ४० कोटी ७६ लाख ३५ हजार रुपयांचा परतावा वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आला आहे.

महावितरणने केले आवाहन

पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीज बिलांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिलदेण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असेआवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Local ad 1