नांदेड जिलल्ह्यात 602 रुग्ण कोरोनामुक्त, आज किती आढळले जाणून घ्या…

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 684 अहवालापैकी 611 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 517 तर अँटिजेन तपासणीद्वारे 94 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 44 एवढी झाली असून यातील 93 हजार 174 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. (602 patients in Nanded district are corona free, find out how many were found today)

आजच्या घडीला 4 हजार 206 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  (602 patients in Nanded district are corona free, find out how many were found today)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे धनेगाव नांदेड येथील 70 वर्षाचा एक पुरुष, हडको येथील 77 वर्षाचा पुरुष, हदगाव तालुक्यातील नेवरी 63 वर्षाची महिला, हदगाव येथील 62 वर्षाच्या पुरुषाचा मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 664 एवढी आहे. (602 patients in Nanded district are corona free, find out how many were found today)

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 327, नांदेड ग्रामीण 57, भोकर 10, देगलूर 2, धर्माबाद 2, कंधार 6, हदगाव 1, किनवट 46, लोहा 15, मुदखेड 2, मुखेड 15, हिमायतनगर 2, औरंगाबाद 2, अर्धापूर 3, बिलोली 3, नायगाव 2, माहूर 6, परभणी 4, हिंगोली 5, यवतमाळ 2, अकोला 1, आदिलाबाद 2, पंजाब 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 3, बिलोली 15, देगलूर 2, धर्माबाद 10, हदगाव 2, किनवट 17, मुखेड 14, नायगाव 12, उमरी 1 असे एकुण 611 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 470, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 110, खाजगी रुग्णालय 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, हदगाव कोविड रुग्णालय 4 असे एकुण 602 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. (602 patients in Nanded district are corona free, find out how many were found today)

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 36, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 159, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 968, किनवट कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 38 असे एकुण 4 हजार 206 व्यक्ती उपचार घेत आहेत. (602 patients in Nanded district are corona free, find out how many were found today)

Local ad 1