पुणे महापालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेसाठी ६ हजार ३९४ जणांचे अर्ज
पुणे : शहरातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी तसेच वडगाव खुर्द या पाच भागांत ४ हजार १७६ घरे बांधण्याचे नियोजन पुणे महापालिकेने केले आहे. त्यासाठी आतापर्यंत ६ हजार ३९४ जणांचे अर्ज आले आहेत. (6 thousand 394 people applied for PM Awas Yojana)
पीएमसीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला बजावली नोटीस ; 48 तासांत 22 कोटी भरा अन्यथा जप्तीचा कारवाई
Related Posts
शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली (Prime Minister Housing Scheme) आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पुणे महापालिकेने वडगाव बुद्रुक, खराडी तसेच हडपसर भागात यापूर्वी २ हजार ९१८ घरे बांधून त्याचे वितरण केले आहे. त्यानंतर सप्टेंबर २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ‘पंतप्रधान आवास योजना ०.२’ची (‘Prime Minister Housing Scheme 0.2’) घोषणा केली. त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढत या योजनेसाठी नागरिकांची घरांसाठी नोंदणी करण्याची सूचना महापालिकेला केली. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. आता महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली होती. ही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात धानाेरी, हडपसर, कोंढवा, बालेवाडी, वडगाव खुर्द, बालेवाडी (Dhanaeri, Hadapsar, Kondhwa, Balewadi, Vadgaon Khurd, Balewadi) येथे ही घरे उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी ४ हजार १७६ घरे बांधण्यासाठी महापालिकेला ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेतून ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. या योजनेसाठी पालिकेकडे आतापर्यंत ६ हजार ३९४ जणांचे अर्ज आले आहेत. अजूनही या योजनेसाठी अर्ज भरता येतील. (6 thousand 394 people applied for PM Awas Yojana)