...

विधानसभा निवडणूक कामावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खानपानावर खर्च होणार पाच कोटी 

पुणे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यात जिल्हास्तरावर निवडणूक अनुषंगिक कामकाजासाठी चहापान व भोजन व्यवस्था पुरवठा करणेकरिता पाच कोटी रुपये खर्चाची ई – निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्या खानपान सेवेसाठी तब्बल पाच कोटी रुपये लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (5 Crores Will Be Spent On Food For The Officers-Employees On Assembly Election Work)

 

 जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Collector Dr. Suhas Divse) यांनी ही निविदा जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदारसंघ असून निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात येणारे अधिकारी तसेच कर्मचारी यांची खानपान सेवा म्हणजेच चहापान आणि भोजन यावर सुमारे पाच कोटी रुपये खर्च येईल. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून निवडणूक विभागाकडून पाच कोटी रुपये खर्च तत्वता मान्यता देऊन ही निविदा काढण्यास परवानगी दिली.
E-Tender Notice
  निवडणूक कर्मचारी यांना देण्यात येणारे चहापाणी आणि भोजन यांच्या दर्जा बद्दलच्या तक्रारी यापूर्वी देखील निवडणूक विभागाकडे आलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पाच कोटी रुपये खर्च करून दर्जेदार भोजन आणि चहा पाणी मिळणार का याची उत्सुकता आहे.
प्रत्येक वेळी सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर निवडणुकीसाठी आलेल्या खर्चाचे ऑडिट केले जाते. मात्र, निवडणूक साहित्य किती उरले आहे याची मात्र पुरेशी नोंद अथवा दखल घेतली जात नाही. त्यामुळे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी शिल्लक साहित्याचा तपशील त्याचा पुनर्वापर तसेच निवडणूक खर्चाला कात्री लावण्या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी या विधानसभा निवडणुकीत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Local ad 1