MH Times Exclusive News । पुणे तिथे काय उणे ! 43 हजार मतदारांच्या मते एकही उमेदवार खासदारकीसाठी पात्र नव्हता म्हणून घेतला ‘हा’ निर्णय

जिल्ह्यातील चार ही लोकसभा मतदार संघातील ४२ हजार ९४२ मतदारांना एकही उमेदवार खासदार होण्यासाठी पात्र वाटले नाही.  त्यामुळे या मतदारांनी नोटा म्हणजेच (NONE OF THE ABOVE) ला  मतदान केले आहे. मावळ  लोकसभा मतदारसंघात  सर्वाधिक १६ हजार ७२९ मतदारांनी  उमेदवारांना नाकारले आहे. (43 thousand voters used ‘NONE OF THE ABOVE’ option in Pune district)
पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात सर्वात कमी ७ हजार ४४८ मतदारांनी या अधिकाराचा वापर केला आहे. बारामती लाेकसभा मतदार संघातील ९ हजार १३०, शिरुरमध्ये ९ हजार ६३४ मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे.