...

पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कामगिरी, 43 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : अवैध दारु विक्री आणि दारु वाहतूक करणार्‍यांवर पुणे विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या (pune excise department) पथकाने कारवाई सुरु केली आहे. त्यात एका खासगी बसच्या झडतीमध्ये 42 लाख 90 हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. (43 lakh liquor stock for sale in Goa state seized in Pune)

 

 

गणेश बाळकृष्ण चव्हाण (वय- 50 वर्षे, रा.मु.पो. कडावळ, सुर्वे वाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), अक्षय अनंत जाधव (वय-32 वर्षे, रा. जी/304, इंद्रप्रस्थ सीएचएस लि., एस.टी. डेपो रोड, नाळे, नालासोपारा (पश्चिम) जि.पालघर) व उमेश सिताराम चव्हाण (वय-37 वर्षे, रा. कासारवाडी, आवळेगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भरारी पथक क्र. 1 चे निरीक्षक समीर पाटील यांचे पथक कात्रज परिसरात गस्त घालत असतांना त्यांना जुन्या पुणे-सातारा रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाच्या समोर एका खासगी बसमधून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या संशयित ट्रॅव्हल्सची झडती घेतली असता मद्यसाठा मिळून आला.
इंटरसिटी स्मार्ट लग्जरी सहाचाकी बस क्र. एमएच 48 सीबी 1111 असे ताब्यात घेतलेल्या ट्रॅव्हल्सचे नाव आहे. या वाहनाच्या डिक्कीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला व फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेला 750 मिली क्षमतेच्या बॅगपायपर क्लासिक व्हिस्कीच्या 180 सिलबंद बाटल्या (15 बॉक्स) मिळून आले. सदर वाहन व गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह 42 लाख 90 हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक वाय. एस. शिंदे, एस. बी. जगदाळे आणि एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकचे निरीक्षक समीर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये एस. एल. पाटील, आर. पी. शेवाळे, विठ्ठल बोबडे, बी.एस. घुगे, प्रवीण देशमुख, दुय्यम निरीक्षक तसेच राजेश एम. पाटील सह. दु. नि. व जवान जयराम काचरा, शरद हंडगर, मुकुंद पोटे यांचा समावेश होता.
Local ad 1