...

राज्यात बारावीच्या परिक्षेत 42 कॉपी बहाद्दर सापडले

पुणे. बारावीची परिक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी परीक्षा मंडळ आणि जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम राबवली आहे. मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. पहिल्याच दिवशी राज्यातील 42 विद्यार्थ्यी कॉपी करताना आढळले आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 26 विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (42 copy-cats found in 12th class exams in the state)

 

आरटीईची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी जाहीर होणार

 

     राज्यातील 3 हजार 373 परिक्षा केंद्रावर 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी 12 वीची परिक्षा देत आहेत. परिक्षा कपीमुक्त करण्यासाठी शिक्षण मंडळाने विशेष उपाययोजवना केल्या आहेत. त्यासाठी राज्यात 274 भऱारी पथके तसेच प्रत्येक केंद्रावर बैठक केंद्रे तैनात करण्यात आली आहेत. विशेष  म्हणजे यंदा पहिल्यांदा परिक्षा केंद्र परिसरात ड्रोनद्वारे चित्रिकरण केले जात आहे. परिक्षेच्या पहिल्या दिवशी 42 ठिकाणी विद्यार्थ्यी कॉपी करताना मिळून आले आहेत. त्यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) विभागात 26 ठिकाणी, त्यापाठोपाठ पुणे (Pune) विभागात 8, नाशिक 3 (Nashik), नागपूर (Nagpur) आणि अमरावती विभागात प्रत्येकी दोन तर लातूर विभागात एका ठिकाणी कॉपी करताना विद्यार्थी आढळला आहे. विशेष म्हणजे मुंबई, कोल्हापूर आणि कोकणात पहिला पेपेर कॉपीमुक्त झाला असून, या तिन्ही मंडळामध्ये कॉपीचा एकही प्रकार घडला नाही.

Local ad 1