नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या 400 कोरोना बाधित
नांदेड : नांदेड शहर आणि जिल्ह्यातील दुसऱ्या दिवशी 400 कोरोना बाधित आढळले आहेत. त्यात नांदेड महापालिका हद्दीतील 251 रुग्ण आहेत. त्यामुळे नांदेडकरांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज 72 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. (400 corona affected in Nanded district for second day in a row)
धक्कादायक । नांदेड जिल्ह्यात तब्बल 474 कोरोना बाधित आढळले
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 618 अहवालापैकी 400 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 343 तर अँटिजेन तपासणीद्वारे 57 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 92 हजार 189 एवढी झाली असून यातील 88 हजार 98 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 436 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (400 corona affected in Nanded district for second day in a row)
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 240, नांदेड ग्रामीण 20, भोकर 1, बिलोली 3, देगलूर 2, धर्माबाद 10, हदगाव 1, हिमायतनगर 1, कंधार 4, किनवट 1, लोहा 9, मुदखेड 21, उमरी 3, परभणी 10, हिंगोली 2, वाशीम 1, अमरावती 1, कोल्हापूर 1, अकोला 4, पुणे 1, जालना 1, मुंबई 2, बीड 1, हैद्राबाद 1, उत्तरप्रदेश 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 11, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 3, बिलोली 2, धर्माबाद 10, हदगाव 2, किनवट 8, मुदखेड 2, मुखेड 7, नायगाव 1, उमरी 9, देगलूर 1असे 400 कोरोना बाधित आढळले आहे.