...

अयोध्येला जाणाऱ्या बसला अपघात ४ भाविकांचा मृत्यू

नांदेड : रविवारी (16 फेब्रुवारी) पहाटे 5:30 वाजता उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोणी कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेस रोडवर रोडच्या बाजूला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या बसवर महाराष्ट्रातून अयोध्येला जाणारी एक टेम्पो ट्रॅव्हलर बसवर आदळून झालेल्या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी आहेत. यातील 3 जण नांदेड शहरातील छत्रपती चौक येथील आहेत. तर भाविक वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील आहे. (4 devotees killed in ayodhya-bound bus accident today)

 

 

पुण्यात ‘नोकरी द्या, नशा नाही’ अशी मागणी करणारे युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

 

मयतांची नावे खालील प्रमाणे आहेत.

1. सुनील दिगांबर वरपडे वय 50 रा. छत्रपती चौक, नांदेड
2. अनुसया दिगांबर वरपडे वय 80 रा. छत्रपती चौक, नांदेड
3. दीपक गणेश गोदले स्वामी वय 40 रा. छत्रपती चौक, नांदेड
4. जयश्री कुंडलिकराव चव्हाण वय 50 रा. आडगाव रंजेबुवा ता. वसमत जि. हिंगोली.

जखमीची नावे

1. चैतन्य राहुल स्वामी वय 16
2. शिवशक्ती गणेश गोदले वय 55
3. भक्ती दीपक गोदले वय 30
4. रंजना रमेश मठपती वय 55
5. गणेश गोदले वय 55
6. अनिता सुनील वरपडे वय 40
7. वीर सुनील वरपडे वय 09
8. सुनिता माधवराव कदम वय 60
9. छाया शंकर कदम वय 60
10. ज्योती प्रदीप गैबडी वय 50
11. आर्या दीपक गोदले वय 05
12. लोकेश गोदले वय 35
13. श्रीदेवी बरगले वय 60
सर्व राहणार छत्रपती चौक नांदेड.
Local ad 1