महसूल विभागात खळबळ : महार वतन जमीन नावावर केल्या प्रकरणी अहमदनगरचे तत्कालिन अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारासह 38 जणांवर गुन्हे दाखल
अहमदनगर : जिल्ह्यातील वडगांव गुप्ता येथील महार वतन जमीन क्षेत्र सुमारे साडेचार हेक्टर अहमदनगरचे तत्कालिन अपर जिल्हाधिकारी (Additional Collector,), उपविभागीय अधिकारी ( Sub Divisional Officer), तहसीलदार (Tehsildar), मंडल अधिकारी (Mandal Officer), तलाठी आणि 32 खासजी व्यक्तींवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा अहमदनगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केला आहे. (38 persons including the then Additional Collector of Ahmednagar, Sub Divisional Officer, Tehsildar have been booked in the case of transfer of land in the name of Mahar Watan.)
बेकायदा जमीन नाववर करुन देण्याचा प्रकार दि.३/१/२००६ पूर्वी ते दि ६ / ९ / २००६ दरम्यान घडला आहे. या प्रकरणात अमहदनगरचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी व्ही. टी. जरे (The then Additional Collector of Ahmadnagar V. T. jare) तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर भाग राजेंद्र मुठे (Rajendra Muthe), तत्कालिन तहसीलदार एल.एन. पाटील, तत्कालीन तलाठी एल.एस. रोहकले, तत्कालिन मंडळ अधिकारी शदर्ण, तत्कालीन सह दुय्यम निबंधक, अहमदनगर-२ दिलीप बबन निराली आणि इतर ३२ आरोपी (खाजगी इसम) यांच्या विरुष्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार दि.३ / १/२००६ रोजीचे पूर्वी ते दि६/९/२००६ रोजी वडगांव गुप्ता शिवारातील गट नं.२०३ क्षेत्र २ हेक्टर, ९७ आर पोट खराबा ०.०९ आर, गट नं.२०५ एकुण क्षेत्र १ हेक्टर, ३४ आर ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब ची जमिन खासगी व्यक्तींना बेकायदेशीर दिली आहे.
तहसिलदार एल.एन. पाटिल यांनी काढलेल्या आदेशास तलाठी एल एस. रोहकले, मंडळ अधिकारी यांनी मदत केली. तर खरेदी विक्री व्यवहाराच्या नियमबाह्य फेरफार नोंदी घेऊन खाजगी इसम उत्कर्ष पाटील व अजित लुंकड यांना मदत केली आहे. तसेच तत्कालीन अपर जिल्हाधिकारी व्ही टी.जरे आणि तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर भाग राजेंद्र मुठे यांना हा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती असुन ही त्यांनी कुठलीही कारवाई न करता बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होऊन प्रोत्साहन दिल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे. तर दिलीप बबन निराली याने खरेदी विक्रीचे बेकायदेशीर दस्त नोंदविले आहे.
जमिनीचे भोगवाटादार दिनकर आनंदा शिंदे, विनायक शंकर शिदे, बाबु आनंदराव शिदे, मोहन आनंदराव शिंदे, वामन किसन शिंदे, यादव किसन शिदे, सदाशिव केशव शिदे, रामभाऊ केशव शिंदे, सुनिल केशव शिदे, यादव केशव शिंदे, श्रीमती मालनबाई केशव शिदे, श्रीमती लता शांतवण भाके, अरण दगड शिदे, शालनबाई दगडु शिदे, लक्मण रामचंद् शिंदे, यधुरा विष्णु शिंदे, सांदिष विष्णु शिंदे, सुनिता रतन गायकवाड,
नंदा शाम घाटविसावे, शालुबाई शाहुराव प्रभुणे, मच्छिंद्र आनंदाव शिदे, लिलाबाई चंद्रभान पाडळे, शोभा बुध्दीराम ठाकुर, तसेच संमती देणारे वत्सलाबाई तुकाराम पाचारणे, सुशिला शांतवण घाटविसावे, तुळसाबाई मारुती नरवडे, छब्बाई भिवाजी साळवे, इंद्रायणी विठ्ठल जाधव, वत्सला वामन जाघव, कौसल्या दामु जगताप यांचे जनरल मुखत्यार, उत्कर्ष सुरेश पाटील (रा श्रमिकनगर आनंदत्रुषीजी मार्ग अहमदनगर व जमिन खरेदी करणारे अजित कचरदास लुंकड (रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड, अहमदनगर) यांना सदरची जमिन ही महार वतन हारडोळ्या इनाम वर्ग ६ ची जमिन असल्याचे माहित असुन, देखील त्यांनी तहसिलदार यांना अटी व शर्तीवर परवानगी देण्यासाठी मदत करुन, खोटे कागदपत्र तयार करुन जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करुन त्याचे दस्त नोंदणी करन ७/१२ उताऱ्यावर व फेरफार नोंदी घेतलेल्या आहेत आहेत.
शासनाची फसवणुक केली आहे. सदर बाबत एम.आय .डी.सी. पो.स्टे, जि अहमदनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ वे कलम १३१९) ड) सह १३ (२) सह भा. दंवि.क.१६७, ४२०, १०९ प्रमाणे दि १९ /०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर हे करीत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंथक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिप्ठा घारगे- बालाबलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेडी, पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक राजु आलहाट, पोहेकॉ संतोप शिदे, पोकाॅ रविंद्र निमसे,पोना विजय गंगुल यांचे समावेश आहे.