नांदेड जिल्ह्यात 334 रुग्ण कोरोनामुक्त

नांदेड : जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 203 अहवालापैकी 215 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 185 तर अँटिजेन तपासणीद्वारे 30 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 495 एवढी झाली असून यातील 96 हजार 415 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 409 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (334 patients corona free in Nanded district)

 

Wine sales। वाईनसाठी आपल्याकडे वातावरण पोषख आहे का?, सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीचा फायदा होईल का?

 

रविवार 30 जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे खडकपुरा नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, वसमत येथील 70 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे उमरखेड येथील 77 वर्षाचा पुरुष तर खाजगी रुग्णालय हाऊसींग सोसायटी नांदेड येथील 82 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 671 एवढी आहे. (334 patients corona free in Nanded district)

 

वाईन विक्रीच्या निर्णयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या..

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 83, नांदेड ग्रामीण 10, बिलोली 1, भोकर 1, धर्माबाद 1, हिमायतनगर 1, हदगाव 3, कंधार 2, किनवट 56, लोहा 4, मुदखेड 3, मुखेड 1, नायगाव 2, उमरी 4, परभणी 9, हिंगोली 2, निजामाबाद 1, वाशीम 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 27, कंधार 3 असे एकुण 215 कोरोना बाधित आढळले आहे. (334 patients corona free in Nanded district)

 

 

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 85, खाजगी रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 242 असे एकुण 334 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. (334 patients corona free in Nanded district)

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 36, किनवट कोविड रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 281, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 56, खाजगी रुग्णालय 32 असे एकुण 2 हजार 409 व्यक्ती उपचार घेत आहेत. (334 patients corona free in Nanded district)
Local ad 1